Online News Portal https://prathampost.in We Serves all type of News Thu, 14 Mar 2024 08:37:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.2 https://prathampost.in/wp-content/uploads/2023/10/cropped-logo-1-32x32.png Online News Portal https://prathampost.in 32 32 लातूर जिल्ह्यातील ४२ हजार लाभार्थ्यांना रेशीम साडी वाटप https://prathampost.in/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a5%aa%e0%a5%a8-%e0%a4%b9%e0%a4%9c%e0%a4%be/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2582%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%259c%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a5%25aa%25e0%25a5%25a8-%25e0%25a4%25b9%25e0%25a4%259c%25e0%25a4%25be https://prathampost.in/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a5%aa%e0%a5%a8-%e0%a4%b9%e0%a4%9c%e0%a4%be/#respond Thu, 14 Mar 2024 08:37:10 +0000 https://prathampost.in/?p=1194   लातूर – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील 42310 कुटुंबांना रेशीम साडी मोफत देण्यात आली आहे. अंत्योदय शिधापत्रिका धारक असलेल्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. मात्र या निमित्ताने पंतप्रधान , मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचे मंत्री यांचे फोटो या कुटुंबांच्या घरात पोहोचवण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने कॅप्टिव्ह मार्केट योजने अंतर्गत …

The post लातूर जिल्ह्यातील ४२ हजार लाभार्थ्यांना रेशीम साडी वाटप first appeared on Online News Portal.

]]>
 

लातूर – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील 42310 कुटुंबांना रेशीम साडी मोफत देण्यात आली आहे. अंत्योदय शिधापत्रिका धारक असलेल्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. मात्र या निमित्ताने पंतप्रधान , मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचे मंत्री यांचे फोटो या कुटुंबांच्या घरात पोहोचवण्यात आलेले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने कॅप्टिव्ह मार्केट योजने अंतर्गत राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला एक रेशीम साडी दरवर्षी मोफत देण्याची योजना सुरू करण्यात आली. सलग पाच वर्षे ही योजना राबवली जाणार आहे. २०२३ ते २०२८ पर्यंत ही योजना राबविण्याचे नियोजन केले आहे. यामुळे पावरलूम धारकांच्या हाताला काम मिळाले आहे. राज्यातील २४ लाख ८० हजार ६६ कुटूंबांना याचा लाभ देण्यात आला आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचे मंत्री यांची छायाचित्रे असणारे स्टिकर साडीवर लावण्यात आलेले होते.
लातूर जिल्ह्यात ४२३१० लाभार्थी
या योजनेचे लातूर जिल्ह्यात 42 हजार 310 लाभार्थी आहेत. यामध्ये लातूर तालुका 9526 लाभार्थी , उदगीर तालुका ४४९७ लाभार्थी , निलंगा तालुका ६५६७ लाभार्थी , औसा तालुका 6255 लाभार्थी , चाकूर तालुका 3072 लाभार्थी, रेणापूर तालुका 2363 लाभार्थी, देवणी तालुका १९३७ शिरोळ पिंपळ तालुका 2018 जळकोट तालुका 1847 लाभार्थी , अहमदपूर तालुका 4218 लाभार्थी आहेत.
खरे तर शासनाच्या वतीने योजना राबवत असताना भेदभाव करणे योग्य आहे ही योजना राबवताना केवळ अंत्योदय शिधापत्रिकाधारक यांनाच याचा लाभ देण्यात आला. राज्यातील सर्वच शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ देण्यात आला पाहिजे होता मात्र तसे न झाल्याने काही प्रमाणात नाराजीचा सुर उमटत आहे.

The post लातूर जिल्ह्यातील ४२ हजार लाभार्थ्यांना रेशीम साडी वाटप first appeared on Online News Portal.

]]>
https://prathampost.in/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a5%aa%e0%a5%a8-%e0%a4%b9%e0%a4%9c%e0%a4%be/feed/ 0
भाजपाची दुसरी यादी जाहीर, लातूरमधून पुन्हा सुधाकर शृंगारे यांना संधी… https://prathampost.in/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%b0/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ad%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2580-%25e0%25a4%259c%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b0 https://prathampost.in/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%b0/#respond Wed, 13 Mar 2024 14:26:30 +0000 https://prathampost.in/?p=1189   लातूर -आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची दुसरी यादी आलेली आहे. महाराष्ट्रातील २० उमेदरावांसह देशभरातील ७२ उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील महायुतीतील जागा वाटपाचे सूत्र निश्चित होण्याआधीच भाजपने उमेदवारांची घोषणा केलेली आहे. लातूरचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना पुन्हा पक्षाने संधी दिली असून त्यांनी प्रथम पोस्ट या वाहिनीशी बोलताना आपण मागील …

The post भाजपाची दुसरी यादी जाहीर, लातूरमधून पुन्हा सुधाकर शृंगारे यांना संधी… first appeared on Online News Portal.

]]>
 

लातूर -आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची दुसरी यादी आलेली आहे. महाराष्ट्रातील २० उमेदरावांसह देशभरातील ७२ उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील महायुतीतील जागा वाटपाचे सूत्र निश्चित होण्याआधीच भाजपने उमेदवारांची घोषणा केलेली आहे. लातूरचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना पुन्हा पक्षाने संधी दिली असून त्यांनी प्रथम पोस्ट या वाहिनीशी बोलताना आपण मागील काळात केलेल्या कामाची पावती मला पक्षाने दिली आहे. आपण पक्षश्रेष्ठी यांचे आभार मानतो आणि लातूरचा सर्वांगीण विकास करणार आहे असे त्यांनी म्हणाले.

कोण आहेत भाजपाचे महाराष्ट्रामधील उमेदवार

.

 

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी उमेदवारांची यादी जाहीर

  • रक्षा खडसे-रावेर
  • अनुप धोत्रे- वर्धा
  • नितीन गडकरी- नागपूर
  • सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर
  • प्रताप चिखलीकर- नांदेड
  • रावसाहेब दानवे- जालना
  • दिंडोरी -भारती पवार
  • भिवंडी-कपील पाटील
  • मुंबई उत्तर-पियुष गोयल
  • मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा
  • पुणे- मुरलीधर मोहोळ
  • सुजय विखे- अहमदनगर दक्षिण
  • सुधाकर श्रृंगारे- लातूर
  • रणजितसिंह नाईक निंबाळकर- माढा
  • संजयकाका पाटील- सांगली
  • हिना गावित-नंदूरबार
  • सुभाष भामरे- धुळे
  • स्मिता वाघ- जळगाव
  • पंकजा मुंडे-बीड
  • सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर

 

The post भाजपाची दुसरी यादी जाहीर, लातूरमधून पुन्हा सुधाकर शृंगारे यांना संधी… first appeared on Online News Portal.

]]>
https://prathampost.in/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%b0/feed/ 0
मुंबई गाठण्याचा सकल मराठा समाजाचा निर्धार लातुरात जिल्हास्तरीय बैठक, नियोजन ठरले, तयारी सुरू https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%2582%25e0%25a4%25ac%25e0%25a4%2588-%25e0%25a4%2597%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a4%25a3%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0 https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0/#respond Tue, 16 Jan 2024 08:09:58 +0000 https://prathampost.in/?p=1184 मुबंई येथे मराठा आरक्षण योध्दे मनोज जरांगे यांच्या नियोजित उपोषणास पाठींबा देण्यासाठी लातूर जिल्ह्यातून हजारो वाहनांच्या माध्यमातून मराठा समाजबांधव मुंबईस रवाना होणार असून  या संभाव्य दौऱ्याच्या नियोजन अन वेळापत्रकावर  सोमवारी (दि.१५) येथील राहिचंद्र मंगल कार्यालयात झालेल्या सकल मराठा समाजाच्या जिल्हास्तरीय बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीस जिल्हयातील विविध तालुके व गाव – शहरातील समाजबांधवांची मोठी …

The post मुंबई गाठण्याचा सकल मराठा समाजाचा निर्धार लातुरात जिल्हास्तरीय बैठक, नियोजन ठरले, तयारी सुरू first appeared on Online News Portal.

]]>
मुबंई येथे मराठा आरक्षण योध्दे मनोज जरांगे यांच्या नियोजित उपोषणास पाठींबा देण्यासाठी लातूर जिल्ह्यातून हजारो वाहनांच्या माध्यमातून मराठा समाजबांधव मुंबईस रवाना होणार असून  या संभाव्य दौऱ्याच्या नियोजन अन वेळापत्रकावर  सोमवारी (दि.१५) येथील राहिचंद्र मंगल कार्यालयात झालेल्या सकल मराठा समाजाच्या जिल्हास्तरीय बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
या बैठकीस जिल्हयातील विविध तालुके व गाव – शहरातील समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पुजनाने बैठकीस सुरुवात झाली. त्यानंतर   समाजबांधवांनी मनोगत व्यक्त केले व त्यांच्या नियोजनाची रुपरेषा सांगितली. दरम्यान या दौऱ्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले असून ट्रॅक्टर, जीप, टेम्पो, कार तसेच सार्वजिनक वाहनांनी अनेकजण जाणार आहेत. त्यांच्यासमवेत खाण्याचे साहित्य असणार आहे. एका वाहनासमवेत दोन स्वयंसेवक असतील व ते त्या वाहनातील समाजबांधवांची काळजी घेतील. ज्येष्ठ नागरीक ,गंभीर आजार असलेले समाजबांधव, १५ ते १८ वर्षाच्या मुलांना या दौऱ्यासाठी टाळावे अशी सुचना यावेळी करण्यात आली. दौऱ्यादरम्यान कोणी समाजकंटक घुसू नये याची खबरदारी घ्यावी,आवश्यक असलेल्या  औषधी गोळ्या सोबत ठेवाव्यात व त्या वेळेवर घ्याव्यात. सोबत शिधा घ्यावा व एकमेकांशी संपर्कात रहावे, कुठेही व कसलेही गालबोट या आंदोलनास लागणार नाही याची काळजी प्रत्येकांनी घ्यावी अशा सुचना यावेळी करण्यात आल्या. ज्या मराठा बांधवांना २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघणाऱ्या पायी दिंडीत सहभागी व्हायचे आहे ते १९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता निघतील, ज्यांना पुणे येथून या दिडींत सामील व्हायचे आहे ते २३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता तर ज्याला थेट मुंबई गाठावयाची आहे ते २६ जानेवारी सकाळी रोजी निघतील. या साऱ्यांचे प्रस्थान दिलेल्या वेळेत लातूर येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करुन होईल. दरम्यान नियोजीत दौऱ्याच्या  नियोजन अन सुचनांबाबत समाजमाध्यमे, बॅनर्स पोस्टर्स व प्रत्यक्ष भेटीतून समाजबांधवांना वेळोवेळी  सांगण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरले.

The post मुंबई गाठण्याचा सकल मराठा समाजाचा निर्धार लातुरात जिल्हास्तरीय बैठक, नियोजन ठरले, तयारी सुरू first appeared on Online News Portal.

]]>
https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0/feed/ 0
परवानगी न घेता झाड तोडले..मनपाकडून गुन्हा दाखल पण दंडात्मक कारवाई नाही https://prathampost.in/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a5%80-%e0%a4%a8-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%ae/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8%25e0%25a4%2597%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%2598%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25be-%25e0%25a4%259d%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a1-%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258b%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25ae https://prathampost.in/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a5%80-%e0%a4%a8-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%ae/#respond Sun, 03 Dec 2023 07:38:41 +0000 https://prathampost.in/?p=1176 लातूर: लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील तुळशीराम कराड यांनी आपल्या मोकळ्या जागेतील अशोकाचे झाड कुठलीही परवानगी न घेता तोडल्यामुळे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी अशाच स्वरूपाचे परवानगी न घेता झाड तोडल्यानंतर संबंधितावर एक लाख रुपये दंड महानगरपालिकेच्या वतीने ठोठावण्यात आला होता. लातूर महानगरपालिका क्षेत्र हरित करण्यासाठी महानगरपालिका काम करत आहे.शहरातील नागरिकांनी याकामी सहकार्य करावे.शहर …

The post परवानगी न घेता झाड तोडले..मनपाकडून गुन्हा दाखल पण दंडात्मक कारवाई नाही first appeared on Online News Portal.

]]>
  • लातूर: लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील तुळशीराम कराड यांनी आपल्या मोकळ्या जागेतील अशोकाचे झाड कुठलीही परवानगी न घेता तोडल्यामुळे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी अशाच स्वरूपाचे परवानगी न घेता झाड तोडल्यानंतर संबंधितावर एक लाख रुपये दंड महानगरपालिकेच्या वतीने ठोठावण्यात आला होता.
  • लातूर महानगरपालिका क्षेत्र हरित करण्यासाठी महानगरपालिका काम करत आहे.शहरातील नागरिकांनी याकामी सहकार्य करावे.शहर आणि परिसरातील कोणतीही झाडे तोडू नयेत. अत्यावश्यक असल्यास झाडे तोडण्यासंदर्भात मनपाकडे अर्ज करावा. महानगरपालिकेने परवानगी दिली तरच झाड तोडावे.परवानगी न घेता झाडे तोडल्याचे निदर्शनास आल्यास दंड वसूल करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल,असा इशाराही मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहारे यांनी दिला आहे.

    लातूर शहरात काही भागात कोणतेही पूर्व परवानगी न घेता अनेक वेळेस झाडे तोडण्यात आली आहेत.याची गंभीर दखल घेत मनपा प्रशासनाने वेळोवेळी दोशींवर एक लाख रुपये आर्थिक दंड आणि गुन्हा दाखल केला आहे. असे असतानाही अनेक वेळेस असे गुन्हे वारंवार केले जात आहेत. त्या दोषिवर वचक बसावा यासाठी आणखीन मोठा आर्थिक दंड आकारण्यात यावा अशी मागणी वसुंधरा प्रतिष्ठान, लातूर वृक्ष यासारख्या पर्यावरण प्रेमी सामाजिक संस्थेने केली आहे.

    एम एस ई बी ची डीपी शिफ्ट करण्यासाठी वृक्ष तोडण्याबाबत ची माहित समोर आली आहे. एम एस ई बी ने मनपाकडे कोणताही अर्ज केला नव्हता. झाड तोडण्याची परवानगी कराड यांनी मागितली होती.मात्र मनपाने झाड तोडण्याबाबतची परवानगी दिली नाही.तरीही झाड तोडण्यात आलं आहे. डीपी साठी काम सुरू झाला आहे.पोल उभे टाकले आहेत. झाड तोडण्याचं मनपाच्या लक्षात आल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीपी शिफ्टींगच काम तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती मनपा उद्यान विभाग प्रमुख समाधान सूर्यवंशी यांनी दिली आहे.या प्रकारावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगले आहे.

    The post परवानगी न घेता झाड तोडले..मनपाकडून गुन्हा दाखल पण दंडात्मक कारवाई नाही first appeared on Online News Portal.

    ]]>
    https://prathampost.in/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a5%80-%e0%a4%a8-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%ae/feed/ 0
    वाय 20 च्या शिखर परिषदेतून विद्यार्थ्यांना सर्वांगिण ज्ञानाचे भांडार उपलब्ध होईल-खा. सुधाकर श्रृंगारे https://prathampost.in/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%af-20-%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%96%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%b5/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25af-20-%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2596%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b7%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2582%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25b5 https://prathampost.in/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%af-20-%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%96%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%b5/#respond Fri, 10 Nov 2023 09:05:14 +0000 https://prathampost.in/?p=1171 लातूर ः-  विकसीत देशांच्या मार्गदर्शनासाठी असलेल्या जी 20 ने युवकांसाठी वाय 20 च्या माध्यमातून संघटन व व्यासपीठ उभे केलेले आहे. वाय 20 च्या पुढाकारातून लातूर येथे होणार्‍या राष्ट्रीय संमग्र  शिखर परिषदेतून विद्यार्थ्यांना सर्वांगिण ज्ञानाचे भांडार उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त करून या ज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भविष्यात लातूर जिल्ह्यासह देशाच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन  खा. …

    The post वाय 20 च्या शिखर परिषदेतून विद्यार्थ्यांना सर्वांगिण ज्ञानाचे भांडार उपलब्ध होईल-खा. सुधाकर श्रृंगारे first appeared on Online News Portal.

    ]]>
    लातूर ः-  विकसीत देशांच्या मार्गदर्शनासाठी असलेल्या जी 20 ने युवकांसाठी वाय 20 च्या माध्यमातून संघटन व व्यासपीठ उभे केलेले आहे. वाय 20 च्या पुढाकारातून लातूर येथे होणार्‍या राष्ट्रीय संमग्र  शिखर परिषदेतून विद्यार्थ्यांना सर्वांगिण ज्ञानाचे भांडार उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त करून या ज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भविष्यात लातूर जिल्ह्यासह देशाच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन  खा. सुधाकर श्रृंगारे यांनी केले.
    लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात वाय 20 च्या पुढाकरातून आणि ए.सी.ई. च्या माध्यमातून पार पडत असलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय समग्र शिखर परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून खा. सुधाकर श्रृंगारे बोलत होते. या परिषदेचे उद्घाटन माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव गव्हाणे, चन्नबस्वेश्वर फॉर्मसीचे संचालक भिमाशंकर देवणीकर, विद्या आराधना अ‍ॅकॅडमीचे संजय लड्डा, सतीष पवार व चन्नबसेश्वर फॉमसीचे प्राचार्य डॉ. विरभद्र स्वामी यांची उपस्थिती होती.
    शिक्षणाचा लातूर पॅटर्न संपूर्ण देशात परिचीत असून लातूरला ज्ञानाची खान म्हणून ओळखले जाते असे सांगत खा. सुधाकर श्रृंगारे म्हणाले की, या ज्ञानाच्या पंढरीत वाय 20 ने राष्ट्रीय समग्र परिषदेचे आयोजन करून लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलेला आहे. या परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळणार असून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने शिक्षण घेण्याची संधी मिळणार असल्याने या परिषदेचा लाभ लातूर शहरासह जिल्ह्यातील शिक्षण संस्था, विद्यार्थी व पालकांनी घ्यावा असे आवाहन खा. सुधाकर श्रृंगारे यांनी यावेळी केले.
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शिक्षण शैलीत अनेक नाविन्यपुर्ण बदल घडत असल्याचे सांगत माजी खा. गोपाळराव पाटील म्हणाले की, देशाच्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊनच वाय 20 ने विद्यार्थ्यांसाठी संघटन व व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे स्पष्ट केले. या राष्ट्रीय समग्र परिषदेतून विद्यार्थ्यांना संगीत, नृत्य आणि खेळाच्या माध्यमातून व बुद्धीमत्ता चाचणीतून विद्यार्थ्यांचे मुल्यमापन होणार असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची दिशा ठरविण्यास मोठी मदत होणार असल्याचे माजी खा. गोपाळराव पाटील यांनी सांगितले. शिक्षणाचा लातूर पॅटर्न देशभर परिचीत असला तरी वाय 20 ने राष्ट्रीय समग्र परिषद येथे घेऊन हा पॅटर्न जागतीक पातळीवर पोहचविण्याचा मानसही व्यक्त केला असल्याचे डॉ. गोपाळराव पाटील यांनी सांगितले.
    कार्यक्रमाच्या प्रास्ताविक ए.सी.ई. समीट आणि क्लास वाईस संस्थेच्या संचालिका वैष्णवी येरटे यांनी राष्ट्रीय समग्र परिषद घेण्याची भुमिका स्पष्ट करत या परिषदेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याचा वेध घेण्यासाठी महामार्ग तयार करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळेच या परिषदेमध्ये अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.
    दोन दिवस चालणार्‍या या राष्ट्रीय समग्र परिषदेत पहिल्या दिवशी शहरासह जिल्ह्यातील 2500 विद्यार्थी व पालकांनी सहभाग नोंदविला. गुरुवार, दि. 09 नोव्हेंबर रोजी समुपदेशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी गट चर्चा आयोजित केली असून याकरीता विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. शिवाणी येरटे तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजर्षी शाहू महाविद्यालय, अक्का फॉऊडेशन व संस्कृती प्रष्ठिानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

    The post वाय 20 च्या शिखर परिषदेतून विद्यार्थ्यांना सर्वांगिण ज्ञानाचे भांडार उपलब्ध होईल-खा. सुधाकर श्रृंगारे first appeared on Online News Portal.

    ]]>
    https://prathampost.in/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%af-20-%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%96%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%b5/feed/ 0
    आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यानी प्रयत्न करावेत- अजित पाटील कव्हेकर  https://prathampost.in/%e0%a4%86%e0%a4%88-%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2586%25e0%25a4%2588-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2582%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a3 https://prathampost.in/%e0%a4%86%e0%a4%88-%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3/#respond Fri, 10 Nov 2023 08:54:14 +0000 https://prathampost.in/?p=1168 एका सर्वसामान्य कुटुंबातील केव्हा येथील बोयणे सुकन्या या विद्यार्थिनीने प्रतिकूल परिस्तिथीवर मात करत पोलीस कॉन्स्टेबल या पदावर रुजू झाली आहे. लातूर तालुक्यातील कव्हा येथील महादेव बोयणे व सुकन्या बोयणे यांच्या संस्कारातून वाढलेली मोनिकाताई बोयणे या मुलीने सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेला असतानाही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आई-वडिलांचे स्वप्न साकार करून मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल या …

    The post आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यानी प्रयत्न करावेत- अजित पाटील कव्हेकर  first appeared on Online News Portal.

    ]]>
    एका सर्वसामान्य कुटुंबातील केव्हा येथील बोयणे सुकन्या या विद्यार्थिनीने प्रतिकूल परिस्तिथीवर मात करत पोलीस कॉन्स्टेबल या पदावर रुजू झाली आहे.
    लातूर तालुक्यातील कव्हा येथील महादेव बोयणे व सुकन्या बोयणे यांच्या संस्कारातून वाढलेली मोनिकाताई बोयणे या मुलीने सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेला असतानाही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आई-वडिलांचे स्वप्न साकार करून मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल या  पदावर नोकरी मिळविण्याचे काम सक्षमपणे केलेले आहे. त्यामुळे कव्हा गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी मोनिकाताईचा आदर्श समोर ठेवून उच्च शिक्षण घेऊन आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नशील रहावे असे प्रतिपादन भाजपा युवा नेते तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केले.
    यावेळी ते कव्हा येथे आयोजित नागरी सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला आई सुकन्या महादेव बोयणे, वडील महादेव बोयणे व कन्या मोनिका बोयणे, मुस्तमीन पटेल, मेजर गिरी, अविनाश बोयणे, सुनिल बोयणे, अमर सारगे, आत्माराम घार, नागेश जाधव, लक्ष्मण सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी पुढे बोलताना युवा नेते अजित पाटील कव्हेकर म्हणाले की, भाजपा नेते शिवाजीराव पाटील कव्हेकर व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई शिवाजीराव  पाटील कव्हेकर यांनी स्मार्ट व्हिलेज कव्हा गावाची ओळख लातूर जिल्हसह राज्याला करून दिली. त्याच गावातील सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेल्या मोनिका महादेव बोयणे या विद्यार्थीनीने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर यश संपादन केले आणि कव्हा गावातील पहिली पोलीस कर्मचारी म्हणून नोकरी मिळविण्याचा मान मिळविलेला आहे. त्यामुळे तिच्या कार्याचा आदर्श घेऊन गावातील तरूणाईने शिक्षण घेऊन यशस्वी वाटचाल करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पोलीस कॉन्स्टेबल मोनिकाताई बोयणे हिचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच बोयणे परिवाराच्यावतीने कार्यक्रमाला आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कव्हा गावातील महिला भगिणी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    The post आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यानी प्रयत्न करावेत- अजित पाटील कव्हेकर  first appeared on Online News Portal.

    ]]>
    https://prathampost.in/%e0%a4%86%e0%a4%88-%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3/feed/ 0
    बोरगाव काळे येथे मराठा आंदोलकाची गळफास घेत आत्महत्या. https://prathampost.in/%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%82/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2597%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b5-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2586%25e0%25a4%2582 https://prathampost.in/%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%82/#respond Fri, 03 Nov 2023 12:16:50 +0000 https://prathampost.in/?p=1164 काल मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषणाला स्थगिती दिली गेली आहे मात्र लातूर जिल्ह्यातील बोरगाव काळे येथे मराठा त्याच्या काही काळ अगोदर आंदोलकांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. सरकार वेळ काढू धोरण करत आहे असे म्हणत गोविंद देशमुख यांनी आपल्या शेतात गळफास घेत आत्महत्या केली आहे. बोरगाव काळे येथील गोविंद मधुकर देशमुख यांनी मराठा …

    The post बोरगाव काळे येथे मराठा आंदोलकाची गळफास घेत आत्महत्या. first appeared on Online News Portal.

    ]]>
    काल मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषणाला स्थगिती दिली गेली आहे मात्र लातूर जिल्ह्यातील बोरगाव काळे येथे मराठा त्याच्या काही काळ अगोदर आंदोलकांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. सरकार वेळ काढू धोरण करत आहे असे म्हणत गोविंद देशमुख यांनी आपल्या शेतात गळफास घेत आत्महत्या केली आहे.
    बोरगाव काळे येथील गोविंद मधुकर देशमुख यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन 50 टक्के च्या आत मराठा समाजाला आरक्षण मिळावे. मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्या मान्य करावे या मागणीसाठी 72 तासाचे उपोषण केले होते. दिनांक 02 /11/2023 सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करत आहेत म्हणून काल 5:00 वाजता आपल्या स्वतःच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली.

    आज पहाटे त्यांनी आत्महत्या केल्याची बाब त्यांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांना लक्षात आली. तर मोठ्या प्रमाणात धावपळ करत त्याचा मृतदेह उपोषण स्थळी घेऊन येण्यात आला.

    आज त्यांचा मृतदेह बोरगाव काळे येथील उपोषण स्थळी आणण्यात आला होता. आजूबाजूच्या अनेक गावातील मराठा आंदोलन यावेळी हजर होते. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच आत्महत्याग्रस्त युवकाच्या कुटुंबातील काय व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी तसेच कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी.

    आंदोलकांची भूमिका लक्षात घेत प्रशासनांना मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू केली आहे. उपोषण स्थळी तहसीलदारांना पाठवण्यात आल आहे ..चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयास सुरू आहे . आजूबाजूच्या गावातील अनेक लोक यावेळी उपोषण स्थळी हजर आहेत. मोठ्या संख्येने आजूबाजूच्या गावातील महिला वर्ग उपोषण स्थळे दाखल झाला आहे.

     

    video link

    The post बोरगाव काळे येथे मराठा आंदोलकाची गळफास घेत आत्महत्या. first appeared on Online News Portal.

    ]]>
    https://prathampost.in/%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%82/feed/ 0
    पीकविमा कार्यालयाला फासले काळे, मनसे ऍक्शन मोड मध्ये https://prathampost.in/%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%b2/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2580%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25ab%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25b2 https://prathampost.in/%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%b2/#respond Thu, 02 Nov 2023 13:45:56 +0000 https://prathampost.in/?p=1161 लातूर – लातूर जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून पावसाने सलग 32 दिवस खंड दिल्याने सोयाबीन पीक आले नाहीत. लातूर जिल्ह्यात पावसाळ्यात पावसाने 21 दिवसाचा खंड दिल्यानंतर पिक विम्याची आग्रीम रक्कम द्यावी लागते असा नियम असतानाही पिक विमा कंपनी अग्रीम ची रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे. आज लातूर शहरातील एसबीआय …

    The post पीकविमा कार्यालयाला फासले काळे, मनसे ऍक्शन मोड मध्ये first appeared on Online News Portal.

    ]]>
    लातूर – लातूर जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून पावसाने सलग 32 दिवस खंड दिल्याने सोयाबीन पीक आले नाहीत. लातूर जिल्ह्यात पावसाळ्यात पावसाने 21 दिवसाचा खंड दिल्यानंतर पिक विम्याची आग्रीम रक्कम द्यावी लागते असा नियम असतानाही पिक विमा कंपनी अग्रीम ची रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे.
    आज लातूर शहरातील एसबीआय जनरल या कंपनीच्या कार्यालयावर मनसेच्या वतीने निदर्शने देण्यात आली. यावेळी कार्यालयाच्या फलकाला व शटरला काळेफासत मनसेने निषेध केला. जिल्हाधिकारी यांनी 31 ऑगस्ट रोजी अधिसूचना काढून कंपनीला कळवले होते की जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा रक्कम ही तात्काळ वाटप करावी. मात्र पिक विमा कंपनी त्या आदेशाला न जुमानता जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले आहे असे सांगत अग्रीम पिक विमा रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे.लातूर जिल्ह्यातील 60 पैकी 32 महसूल मंडळांना आग्रीम पिक विमा देण्याचा मानस पिक विमा कंपनीने दाखवला आहे पण जिल्ह्यातील साठ महसूल मंडळाला सरसकट अग्रीम पीक विमा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जर दिवाळीच्या आधी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही झाली तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस तथा शेतकरी प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी यावेळी दिला. यावेळी
    संजय राठोड, बाळासाहेब मुंडे, मनोज अभंगे, रवी सुर्यवंशी, किरण चव्हाण, वैभव जाधव, प्रीती ताई भगत, यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

    Video link

    The post पीकविमा कार्यालयाला फासले काळे, मनसे ऍक्शन मोड मध्ये first appeared on Online News Portal.

    ]]>
    https://prathampost.in/%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%b2/feed/ 0
    लातुरात आज लिंगायत समाजाचा धडक मोर्चा. https://prathampost.in/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%9c-%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%2586%25e0%25a4%259c-%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2582%25e0%25a4%2597%25e0%25a4%25be%25e0%25a4%25af%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a4%25be https://prathampost.in/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%9c-%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be/#respond Mon, 30 Oct 2023 13:40:49 +0000 https://prathampost.in/?p=1157 महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजातील हिंदू लिंगायत या जातीसह राज्य मागास वर्ग आयोगाकडे प्रलंबित असलेले विविध प्रकरणाचा तात्काळ निपटारा करावा ..हिंदू लिंगायत जातीला ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी आज लातूरमध्ये धडक मोर्चाचा आयोजन करण्यात आलं होतं. शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना आणि लिंगायत समाजातील विविध संघटनांनी एकत्र येत धडक मोर्चाचा आयोजन केलं होतं. लातूर …

    The post लातुरात आज लिंगायत समाजाचा धडक मोर्चा. first appeared on Online News Portal.

    ]]>
    महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजातील हिंदू लिंगायत या जातीसह राज्य मागास वर्ग आयोगाकडे प्रलंबित असलेले विविध प्रकरणाचा तात्काळ निपटारा करावा ..हिंदू लिंगायत जातीला ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी आज लातूरमध्ये धडक मोर्चाचा आयोजन करण्यात आलं होतं. शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना आणि लिंगायत समाजातील विविध संघटनांनी एकत्र येत धडक मोर्चाचा आयोजन केलं होतं.
    लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा धडक मोर्चा नेण्यात आला होता. हिंदू लिंगायत जातीचे एकूण 32 उपजातींचा ओबीसी एबीसी एन टी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. हिंदू लिंगायत जातीच्या विविध प्रश्न तात्काळ मार्गी लावावे त्याचा निपटारा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांच्या भक्ती स्थळ या ठिकाणासाठी भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा. श्रीक्षेत्र कपिलधारा चा विकास करावा तसेच 2015 च्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला जगत ज्योति महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठीचे काम युद्धपातळीवर सुरु करावे अशा मागण्या यावेळी सादर करण्यात आल्या.
    लातूर बीड आणि धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात समाज बांधव यावेळी लातूरमध्ये दाखल झाले होते. लातूरच्या गंजगोला येथील महात्मा बसवेश्वर मंदिरापासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.त्यानंतर एक सभा ही इथे पार पडली.
    येणाऱ्या काळामध्ये लिंगायत समाजाच्या विविध प्रश्न मार्गीय लावले नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. आज लातूर जिल्ह्यात ज्या पद्धतीने धरणे आंदोलन आणि धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे तसाच मोर्चा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे

     

     

    video link

    The post लातुरात आज लिंगायत समाजाचा धडक मोर्चा. first appeared on Online News Portal.

    ]]>
    https://prathampost.in/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%9c-%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be/feed/ 0
    गोंद्री येथील तरुणाची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या… https://prathampost.in/%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2597%25e0%25a5%258b%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b0 https://prathampost.in/%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0/#respond Sun, 29 Oct 2023 12:12:08 +0000 https://prathampost.in/?p=1154 मराठा आरक्षणाचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे.राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन, मोर्चा ,ठिय्या आंदोलन ,उपोषण अश्या अनेक मार्गाने सरकारपर्यंत आरक्षणाच्या मागणीचा पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र काही भावनिक तरुण हे जीवाचे बरे वाईट ही करून घेत आहेत.जिल्ह्यातील गोंद्री ता.औसा येथील मराठा तरुण शरद वसंत भोसले वय वर्ष 32 यांनी आज सकाळी आत्महत्या केली आहे..सरकार मराठ्याला आरक्षण …

    The post गोंद्री येथील तरुणाची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या… first appeared on Online News Portal.

    ]]>
    मराठा आरक्षणाचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे.राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन, मोर्चा ,ठिय्या आंदोलन ,उपोषण अश्या अनेक मार्गाने सरकारपर्यंत आरक्षणाच्या मागणीचा पाठपुरावा करण्यात येत आहे.
    मात्र काही भावनिक तरुण हे जीवाचे बरे वाईट ही करून घेत आहेत.जिल्ह्यातील गोंद्री ता.औसा येथील मराठा तरुण शरद वसंत भोसले वय वर्ष 32 यांनी आज सकाळी आत्महत्या केली आहे..सरकार मराठ्याला आरक्षण का देत नाही अश्या अशयाची चिट्टी लिहून या तरुणाने स्वतःच्या शेतातल्या आपट्याच्या झाडाला गळपास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.हा तरुण अवघ्या ३२ वर्षाचा असून त्यांच्या पश्यात पत्नी कोमलबाई शरद भोसले वय वर्ष २५ आणि त्यांना दोन मुली एक अश्विनी शरद भोसले वय वर्ष ७ दुसरी राणी शरद भोसले वय वर्ष ५ व आई वडील भाऊ असा परिवार आहे.

    मागील तीन दिवसात जिल्ह्यातील तिसरी आत्महत्या….
    “मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे” अशी चिठ्ठी लिहून लातूर जिल्ह्यातील माजी सरपंचाने आळंदी येथील इंद्रायणीत उडी मारून आत्महत्या केली होती. माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांनी शुक्रवारी इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. आज त्यांचा मृतदेह लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तहसील समोर आणण्यात आला आहे. माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांचा मुळगाव उमरदरा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत..
    दुष्काळ जगू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही असं स्टेटस ठेवून युवकाची आत्महत्या, अहमदपूर तालुक्यातल्या ढाळेगाव येथील घटना.महेश कदम असं मयत युवकाचे नाव, घरची परिस्थिती चांगली असली तरी मराठा आरक्षणा बाबत होता चिंतेत. विषारी औषध घेतले ,उपचारा दरम्यान झाला मृत्यू.
    आरक्षणाचा लढा सदस्य मार्गाने आंदोलन करून धसास लावावा मात्र भावनिक झालेले तरुण आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याचे विदारक चित्र सध्या राज्यभर निर्माण झाले आहे ..

     

    video link

    The post गोंद्री येथील तरुणाची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या… first appeared on Online News Portal.

    ]]>
    https://prathampost.in/%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0/feed/ 0