महाराष्ट्र

वाय 20 च्या शिखर परिषदेतून विद्यार्थ्यांना सर्वांगिण ज्ञानाचे भांडार उपलब्ध होईल-खा. सुधाकर श्रृंगारे

लातूर ः-  विकसीत देशांच्या मार्गदर्शनासाठी असलेल्या जी 20 ने युवकांसाठी वाय 20 च्या माध्यमातून संघटन व व्यासपीठ उभे केलेले आहे. वाय 20 च्या पुढाकारातून लातूर येथे होणार्‍या राष्ट्रीय संमग्र  शिखर परिषदेतून विद्यार्थ्यांना सर्वांगिण ज्ञानाचे भांडार उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त करून या ज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भविष्यात लातूर जिल्ह्यासह देशाच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन  खा. सुधाकर श्रृंगारे यांनी केले.
लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात वाय 20 च्या पुढाकरातून आणि ए.सी.ई. च्या माध्यमातून पार पडत असलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय समग्र शिखर परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून खा. सुधाकर श्रृंगारे बोलत होते. या परिषदेचे उद्घाटन माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव गव्हाणे, चन्नबस्वेश्वर फॉर्मसीचे संचालक भिमाशंकर देवणीकर, विद्या आराधना अ‍ॅकॅडमीचे संजय लड्डा, सतीष पवार व चन्नबसेश्वर फॉमसीचे प्राचार्य डॉ. विरभद्र स्वामी यांची उपस्थिती होती.
शिक्षणाचा लातूर पॅटर्न संपूर्ण देशात परिचीत असून लातूरला ज्ञानाची खान म्हणून ओळखले जाते असे सांगत खा. सुधाकर श्रृंगारे म्हणाले की, या ज्ञानाच्या पंढरीत वाय 20 ने राष्ट्रीय समग्र परिषदेचे आयोजन करून लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलेला आहे. या परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळणार असून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने शिक्षण घेण्याची संधी मिळणार असल्याने या परिषदेचा लाभ लातूर शहरासह जिल्ह्यातील शिक्षण संस्था, विद्यार्थी व पालकांनी घ्यावा असे आवाहन खा. सुधाकर श्रृंगारे यांनी यावेळी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शिक्षण शैलीत अनेक नाविन्यपुर्ण बदल घडत असल्याचे सांगत माजी खा. गोपाळराव पाटील म्हणाले की, देशाच्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊनच वाय 20 ने विद्यार्थ्यांसाठी संघटन व व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे स्पष्ट केले. या राष्ट्रीय समग्र परिषदेतून विद्यार्थ्यांना संगीत, नृत्य आणि खेळाच्या माध्यमातून व बुद्धीमत्ता चाचणीतून विद्यार्थ्यांचे मुल्यमापन होणार असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची दिशा ठरविण्यास मोठी मदत होणार असल्याचे माजी खा. गोपाळराव पाटील यांनी सांगितले. शिक्षणाचा लातूर पॅटर्न देशभर परिचीत असला तरी वाय 20 ने राष्ट्रीय समग्र परिषद येथे घेऊन हा पॅटर्न जागतीक पातळीवर पोहचविण्याचा मानसही व्यक्त केला असल्याचे डॉ. गोपाळराव पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक ए.सी.ई. समीट आणि क्लास वाईस संस्थेच्या संचालिका वैष्णवी येरटे यांनी राष्ट्रीय समग्र परिषद घेण्याची भुमिका स्पष्ट करत या परिषदेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याचा वेध घेण्यासाठी महामार्ग तयार करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळेच या परिषदेमध्ये अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.
दोन दिवस चालणार्‍या या राष्ट्रीय समग्र परिषदेत पहिल्या दिवशी शहरासह जिल्ह्यातील 2500 विद्यार्थी व पालकांनी सहभाग नोंदविला. गुरुवार, दि. 09 नोव्हेंबर रोजी समुपदेशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी गट चर्चा आयोजित केली असून याकरीता विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. शिवाणी येरटे तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजर्षी शाहू महाविद्यालय, अक्का फॉऊडेशन व संस्कृती प्रष्ठिानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button