लातूर

आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यानी प्रयत्न करावेत- अजित पाटील कव्हेकर 

एका सर्वसामान्य कुटुंबातील केव्हा येथील बोयणे सुकन्या या विद्यार्थिनीने प्रतिकूल परिस्तिथीवर मात करत पोलीस कॉन्स्टेबल या पदावर रुजू झाली आहे.
लातूर तालुक्यातील कव्हा येथील महादेव बोयणे व सुकन्या बोयणे यांच्या संस्कारातून वाढलेली मोनिकाताई बोयणे या मुलीने सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेला असतानाही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आई-वडिलांचे स्वप्न साकार करून मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल या  पदावर नोकरी मिळविण्याचे काम सक्षमपणे केलेले आहे. त्यामुळे कव्हा गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी मोनिकाताईचा आदर्श समोर ठेवून उच्च शिक्षण घेऊन आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नशील रहावे असे प्रतिपादन भाजपा युवा नेते तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते कव्हा येथे आयोजित नागरी सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला आई सुकन्या महादेव बोयणे, वडील महादेव बोयणे व कन्या मोनिका बोयणे, मुस्तमीन पटेल, मेजर गिरी, अविनाश बोयणे, सुनिल बोयणे, अमर सारगे, आत्माराम घार, नागेश जाधव, लक्ष्मण सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना युवा नेते अजित पाटील कव्हेकर म्हणाले की, भाजपा नेते शिवाजीराव पाटील कव्हेकर व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई शिवाजीराव  पाटील कव्हेकर यांनी स्मार्ट व्हिलेज कव्हा गावाची ओळख लातूर जिल्हसह राज्याला करून दिली. त्याच गावातील सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेल्या मोनिका महादेव बोयणे या विद्यार्थीनीने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर यश संपादन केले आणि कव्हा गावातील पहिली पोलीस कर्मचारी म्हणून नोकरी मिळविण्याचा मान मिळविलेला आहे. त्यामुळे तिच्या कार्याचा आदर्श घेऊन गावातील तरूणाईने शिक्षण घेऊन यशस्वी वाटचाल करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पोलीस कॉन्स्टेबल मोनिकाताई बोयणे हिचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच बोयणे परिवाराच्यावतीने कार्यक्रमाला आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कव्हा गावातील महिला भगिणी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button