लातूर

गोंद्री येथील तरुणाची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या…

मराठा आरक्षणाचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे.राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन, मोर्चा ,ठिय्या आंदोलन ,उपोषण अश्या अनेक मार्गाने सरकारपर्यंत आरक्षणाच्या मागणीचा पाठपुरावा करण्यात येत आहे.
मात्र काही भावनिक तरुण हे जीवाचे बरे वाईट ही करून घेत आहेत.जिल्ह्यातील गोंद्री ता.औसा येथील मराठा तरुण शरद वसंत भोसले वय वर्ष 32 यांनी आज सकाळी आत्महत्या केली आहे..सरकार मराठ्याला आरक्षण का देत नाही अश्या अशयाची चिट्टी लिहून या तरुणाने स्वतःच्या शेतातल्या आपट्याच्या झाडाला गळपास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.हा तरुण अवघ्या ३२ वर्षाचा असून त्यांच्या पश्यात पत्नी कोमलबाई शरद भोसले वय वर्ष २५ आणि त्यांना दोन मुली एक अश्विनी शरद भोसले वय वर्ष ७ दुसरी राणी शरद भोसले वय वर्ष ५ व आई वडील भाऊ असा परिवार आहे.

मागील तीन दिवसात जिल्ह्यातील तिसरी आत्महत्या….
“मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे” अशी चिठ्ठी लिहून लातूर जिल्ह्यातील माजी सरपंचाने आळंदी येथील इंद्रायणीत उडी मारून आत्महत्या केली होती. माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांनी शुक्रवारी इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. आज त्यांचा मृतदेह लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तहसील समोर आणण्यात आला आहे. माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांचा मुळगाव उमरदरा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत..
दुष्काळ जगू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही असं स्टेटस ठेवून युवकाची आत्महत्या, अहमदपूर तालुक्यातल्या ढाळेगाव येथील घटना.महेश कदम असं मयत युवकाचे नाव, घरची परिस्थिती चांगली असली तरी मराठा आरक्षणा बाबत होता चिंतेत. विषारी औषध घेतले ,उपचारा दरम्यान झाला मृत्यू.
आरक्षणाचा लढा सदस्य मार्गाने आंदोलन करून धसास लावावा मात्र भावनिक झालेले तरुण आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याचे विदारक चित्र सध्या राज्यभर निर्माण झाले आहे ..

 

video link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button