लातूर

लातुरात आज लिंगायत समाजाचा धडक मोर्चा.

महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजातील हिंदू लिंगायत या जातीसह राज्य मागास वर्ग आयोगाकडे प्रलंबित असलेले विविध प्रकरणाचा तात्काळ निपटारा करावा ..हिंदू लिंगायत जातीला ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी आज लातूरमध्ये धडक मोर्चाचा आयोजन करण्यात आलं होतं. शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना आणि लिंगायत समाजातील विविध संघटनांनी एकत्र येत धडक मोर्चाचा आयोजन केलं होतं.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा धडक मोर्चा नेण्यात आला होता. हिंदू लिंगायत जातीचे एकूण 32 उपजातींचा ओबीसी एबीसी एन टी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. हिंदू लिंगायत जातीच्या विविध प्रश्न तात्काळ मार्गी लावावे त्याचा निपटारा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांच्या भक्ती स्थळ या ठिकाणासाठी भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा. श्रीक्षेत्र कपिलधारा चा विकास करावा तसेच 2015 च्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला जगत ज्योति महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठीचे काम युद्धपातळीवर सुरु करावे अशा मागण्या यावेळी सादर करण्यात आल्या.
लातूर बीड आणि धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात समाज बांधव यावेळी लातूरमध्ये दाखल झाले होते. लातूरच्या गंजगोला येथील महात्मा बसवेश्वर मंदिरापासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.त्यानंतर एक सभा ही इथे पार पडली.
येणाऱ्या काळामध्ये लिंगायत समाजाच्या विविध प्रश्न मार्गीय लावले नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. आज लातूर जिल्ह्यात ज्या पद्धतीने धरणे आंदोलन आणि धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे तसाच मोर्चा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे

 

 

video link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button