लातूर

पीकविमा कार्यालयाला फासले काळे, मनसे ऍक्शन मोड मध्ये

लातूर – लातूर जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून पावसाने सलग 32 दिवस खंड दिल्याने सोयाबीन पीक आले नाहीत. लातूर जिल्ह्यात पावसाळ्यात पावसाने 21 दिवसाचा खंड दिल्यानंतर पिक विम्याची आग्रीम रक्कम द्यावी लागते असा नियम असतानाही पिक विमा कंपनी अग्रीम ची रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे.
आज लातूर शहरातील एसबीआय जनरल या कंपनीच्या कार्यालयावर मनसेच्या वतीने निदर्शने देण्यात आली. यावेळी कार्यालयाच्या फलकाला व शटरला काळेफासत मनसेने निषेध केला. जिल्हाधिकारी यांनी 31 ऑगस्ट रोजी अधिसूचना काढून कंपनीला कळवले होते की जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा रक्कम ही तात्काळ वाटप करावी. मात्र पिक विमा कंपनी त्या आदेशाला न जुमानता जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले आहे असे सांगत अग्रीम पिक विमा रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे.लातूर जिल्ह्यातील 60 पैकी 32 महसूल मंडळांना आग्रीम पिक विमा देण्याचा मानस पिक विमा कंपनीने दाखवला आहे पण जिल्ह्यातील साठ महसूल मंडळाला सरसकट अग्रीम पीक विमा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जर दिवाळीच्या आधी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही झाली तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस तथा शेतकरी प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी यावेळी दिला. यावेळी
संजय राठोड, बाळासाहेब मुंडे, मनोज अभंगे, रवी सुर्यवंशी, किरण चव्हाण, वैभव जाधव, प्रीती ताई भगत, यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Video link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button