- लातूर: लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील तुळशीराम कराड यांनी आपल्या मोकळ्या जागेतील अशोकाचे झाड कुठलीही परवानगी न घेता तोडल्यामुळे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी अशाच स्वरूपाचे परवानगी न घेता झाड तोडल्यानंतर संबंधितावर एक लाख रुपये दंड महानगरपालिकेच्या वतीने ठोठावण्यात आला होता.
लातूर महानगरपालिका क्षेत्र हरित करण्यासाठी महानगरपालिका काम करत आहे.शहरातील नागरिकांनी याकामी सहकार्य करावे.शहर आणि परिसरातील कोणतीही झाडे तोडू नयेत. अत्यावश्यक असल्यास झाडे तोडण्यासंदर्भात मनपाकडे अर्ज करावा. महानगरपालिकेने परवानगी दिली तरच झाड तोडावे.परवानगी न घेता झाडे तोडल्याचे निदर्शनास आल्यास दंड वसूल करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल,असा इशाराही मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहारे यांनी दिला आहे.
लातूर शहरात काही भागात कोणतेही पूर्व परवानगी न घेता अनेक वेळेस झाडे तोडण्यात आली आहेत.याची गंभीर दखल घेत मनपा प्रशासनाने वेळोवेळी दोशींवर एक लाख रुपये आर्थिक दंड आणि गुन्हा दाखल केला आहे. असे असतानाही अनेक वेळेस असे गुन्हे वारंवार केले जात आहेत. त्या दोषिवर वचक बसावा यासाठी आणखीन मोठा आर्थिक दंड आकारण्यात यावा अशी मागणी वसुंधरा प्रतिष्ठान, लातूर वृक्ष यासारख्या पर्यावरण प्रेमी सामाजिक संस्थेने केली आहे.
एम एस ई बी ची डीपी शिफ्ट करण्यासाठी वृक्ष तोडण्याबाबत ची माहित समोर आली आहे. एम एस ई बी ने मनपाकडे कोणताही अर्ज केला नव्हता. झाड तोडण्याची परवानगी कराड यांनी मागितली होती.मात्र मनपाने झाड तोडण्याबाबतची परवानगी दिली नाही.तरीही झाड तोडण्यात आलं आहे. डीपी साठी काम सुरू झाला आहे.पोल उभे टाकले आहेत. झाड तोडण्याचं मनपाच्या लक्षात आल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीपी शिफ्टींगच काम तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती मनपा उद्यान विभाग प्रमुख समाधान सूर्यवंशी यांनी दिली आहे.या प्रकारावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगले आहे.