लातूर

आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या माजी सरपंच यांचे पार्थिव तहसील कार्यलयात ठेवून मागण्या मान्य होईपर्यंत अंत्यसंस्कार नाही.

आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या माजी  सरपंच यांनी काल मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे या मागणीसाठी आत्महत्या केली असून आज त्यांचे पार्थिव मूळ गावी शिरूर अनंतपाळ येथे आणण्यात आले. मराठा समाजाच्यावतीने तहसील कार्यालयात हे पार्थिव ठेवन्याय आले.

मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे” अशी चिठ्ठी लिहून लातूर जिल्ह्यातील माजी सरपंचाने आळंदी येथील इंद्रायणीत उडी मारून आत्महत्या केली होती. माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांनी शुक्रवारी इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. आज त्यांचा मृतदेह लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तहसील समोर आणण्यात आला आहे. माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांचा मुळगाव उमरदरा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत..
मराठा आरक्षणासाठी शिरूर अनंतपाळ तहसील समोर उपोषण सुरू आहे. याच ठिकाणी व्यंकट ढोपरे यांचा मृतदेह आणण्यात आला आहे. व्यंकट ढोपरे यांच्या आत्महत्येच्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात उल्लेख केलेल्या बाबीची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करू देणार नाहीत अशी भूमिका आता आंदोलकानी घेतली आहे. आळंदी वरून मृतदेह ज्या ॲम्बुलन्स मध्ये आणण्यात आले आहेत ती ॲम्बुलन्स तिथेच थांबून ठेवण्यात आली आहे.
माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांच्या आत्महत्या नंतर शिरूर अनंतपाळ तालुक्यात शोकाकुल वातावरण आहे. आज शिरूर अनंतपाळ शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तालुक्यातील अनेक लोक शिरांतपाळ तहसील समोर एकत्र आले आहेत. माजी सरपंच यांचा मृतदेह असलेली ॲम्बुलन्स आणि तालुक्यातून एकत्र आलेले आंदोलन हे सर्व तहसील समोर गोळा झाले आहेत. या घटनेची नोंद घेत प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

काय लिहिले होते पत्रात….
मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे. खूप वेळा सरपंच या नात्याने मी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. माझ्या गावातील सर्व जातीधर्माच्या समाजाला घेऊन बऱ्याचवेळेस मोर्चामध्ये सहभाग घेऊन संघर्ष केला, पण सरकारला त्याबद्दल आतापर्यंत दया आली नाही. माझ्या मुलाचा कृषी खात्यात २०१२ ला अनुकंपातत्त्वाखाली माझ्या पत्नीच्या वडिलांच्या जागी प्रस्ताव दाखल केला.त्यानंतर कागदपत्रे कृषी संचालक कार्यालयात जमा करा, असे पत्र देण्यात आले. त्यानुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. तरीसुद्धा आजी-आजोबांच्या जागेवर नोकरी देता येत नाही, अशी पत्राद्वारे माहिती दिली. ती जागा आमच्या हक्काची असून, त्याची पूर्ण फाइल माझ्या गावी घरी कपाटात आहे. अधिकाऱ्यांच्या अपेक्षेपोटी आम्ही डावलले गेलो. आमच्या पदरी निराशा टाकण्यात आली. आज रोजी माझा मुलगा बेकार फिरत आहे. मी सरपंच या नात्याने २०२१ ला ६५ वर्षीय निराधार लोकांच्या पगारासाठी शिरूर अनंतपाळ तहसीलदारांकडे ५० ते ६० लोकांचे पेपर देऊनदेखील त्या गरीब लोकांचे पगार शासन व प्रशासनाने केले नाहीत. हे शासन प्रशासन स्वत:ची खळगी भरण्यात व्यस्त आहेत. जनतेला न्याय भेटत नाही. या निराशेपोटी मी माझी आहुती देत आहे. ‘

अशा आशयाचे पत्र लिहून व्यंकट ढोपरे यांनी आत्महत्या केली होती. याची माहिती कळल्यानंतर शिरूर अनंतपाळ मधील आंदोलक भावनिक झाले होते. त्यामुळे आज शिरूर अनंतपाळ बंदची हाक देण्यात आली असून मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करू देणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

 

VIDEO LINK

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button