लातूर – महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघ यांच्यामार्फत आज लातूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जिल्हा परिषद असा मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 70 हजार अशा स्वयंसेविका कार्यरत आहेत अशा स्वयंसेविकांना कामावर आधारित मोबदला मिळतो अशा स्वयंसेविका या आरोग्याचे महत्त्वाचे काम करत असून ते आरोग्य विभागाचा कणा आहेत आणि दिवाळीमध्ये या सर्व अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक बेमुदत संपावर गेले आहेत. शासकीय आरोग्य संस्थेत सुरक्षित प्रसूती करून माता मृत्यू व बालमृत्यूला आळा घालण्यासाठी अशा स्वयंसेवकाचे नियुक्ती करण्यात आली आहे. या मोर्चामध्ये लातूर जिल्ह्यातील एकूण सोळाशे अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी सहभाग नोंदवला असून यावेळी राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात आक्रोश व्यक्त केला आहे.
आशा स्वयंसेविका यांच्या मागण्या काय आहेत
१अशा स्वयंसेविकांना कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन कामे सांगण्यात येऊ नये.
२ अशा स्वयंसेविकांना दरवर्षी दिवाळीपूर्वी एक महिन्याचा मोबदला एवढा बोनस देण्यात यावा.
३ ऑक्टोबर 2018 नंतर केंद्र शासनाने अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ केलेली नाही केंद्र शासनाकडून मोबदल्यात वाढ मिळवून देण्यात यावी.
४ अशा स्वयंसेवकांना दरमहा २६ हजार रुपये किमान वेतन मिळावे
५ आरोग्यवर्धिनी अंतर्गत केलेल्या कामाच्या मोबदल्याची थकबाकी अशा स्वयंसेवकांना त्वरित देण्यात यावे.
या मागण्यांसाठी लातूर येथे आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
video link