राजकीय

जिल्ह्याला जलसाक्षर करायला निघालेल्या नेताच साक्षर करण्याची गरज – अभय साळुंके.

यंदा अत्यल्प पावसामुळे पाणीटंचाई ही लातूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अर्धा पाऊसच जिल्ह्यात पडला आहे यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या काळात पाणीटंचाई होणार असल्याचे चित्र दिसत असताना निलंगा तालुक्यातील औराद येथे मांजरा व निम्न तेरणा या दोन्ही नद्यांच्या संगमावरून डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी एक कोल्हापुरी बंधारा असून या बंधाऱ्यातून लाखो  क्यूसेक्स पाणी आपल्या शेजारील कर्नाटक राज्यांमध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे. कर्नाटक सरकारने कोंगळी बंदाऱ्यावर पाणी साठवून ठेवले आहे ज्यामुळे कर्नाटक भागातील शेतकरी सुखावला आहे पण महाराष्ट्रातील शेतकरी मात्र पाण्यापासून वंचित राहणार आहे. निलंगा विधानसभेचे आमदार संभाजी पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाभरात जलसाक्षरता रॅलीचे आयोजन केले होते पण त्यांच्याच मतदारसंघांमधील पाणी हे शेजारील राज्य कर्नाटक येथे वाहून गेले आहे. याचे कारण म्हणजे या बंधार्‍यावर दरवाजे न टाकल्यामुळे लाखो क्युसेक्स लिटर पाणी वाहून गेले आहे यामुळे तेथील शेतकऱ्यांना शेतीसाठी व गुरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार असल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे नेते अभय साळुंखे यांनी या ठिकाणी जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला व आता तरी सर्वाचे बसून परतीचा पाऊस जर पडला तर ते अडवण्याचे काम आपण करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. या बंधाऱ्यावर पाच गावातील शेतकऱ्यांची शेती अवलंबून असून त्यांना रवीची पेरणी करावी की नाही असा प्रश्न उद्भवला आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे जिल्हाभरामध्ये जलसाक्षरता रॅलीच्या माध्यमातून जिल्ह्यात साक्षरतारा व्हावी म्हणून ते फिरले पण दिव्याखाली अंधार अशा शब्दांमध्ये त्यांनी टीका केली आहे.

video link

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button