लातूर – लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आज विद्यार्थ्यांचा मोठा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. कंत्राटी नोकर भरती जीआर रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजाता आंबेडकर यांनी केले. कंत्राटी नोकर भरतीचा शासकीय आदेश तात्काळ रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थ्या आंदोलन लातूर आयोजित विद्यार्थी हक्क महामोर्चा चे आज लातूर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते राज्यातील अनेक भागांमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे अंतिम मोर्चा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मुंबई येथे होणार आहे.
देशभरातील खाजगीकरण तात्काळ बंद करावे, कंत्राटी पद्धतीने नियुक्ती रद्द करा, 62 हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत आहेत ते थांबवावा, अनेक परीक्षा एक फिस असे धोरण सरकारने स्वीकारावे, ज्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी लूट थांबवली जाऊ शकते अशा मागण्यांचे फलक विद्यार्थी रस्त्यावर आले होते.
हा मोर्चा हा मोर्चा लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून जुने जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत चालत हजारो विद्यार्थी या मोर्चात.
आज देशातील एकूण राजकीय परिस्थिती लक्षात घेता सर्वत्र आशादायक चित्र नाहीये. मात्र ह्या देशातील तरुण आता जागृत होतो आहे. या मोर्चाचे प्रमुख आकर्षण विठ्ठल कांगणे सर हे ठरले कारण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सजग असतात.
या मोर्चाचा काय मागण्या आहेत-
1 सरकारी क्षेत्रातील खाजगीकरण व कंत्राटीकरण तात्काळ थांबविण्यात यावे.
2 कंत्राटी नोकर भरती भरतीचा जीआर तात्काळ रद्द करावा.
3 स्पर्धा परीक्षेसाठी राज्यस्थानचा धरतीवर एकच परीक्षा शुल्क आकारण्यात यावे.
4 राज्यातील 62 हजार जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा.
5 सर्व शासकीय रिक्त पदांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी.
6 राज्यसेवा व सरळ सेवा भरती एमपीएससीच्या मार्फत घेण्यात यावी.
7 केजी ते पी जी हे शिक्षण सर्वांना मोफत मिळावे.