लातूर जिल्हा हा सोयाबीनचे केंद्र म्हणून ओळखला जातो. लातूर जिल्ह्यातील 65 ते 70 टक्के शेतकरी हे सोयाबीनचे पीक घेत असतात पण यावर्षी सोयाबीनला कमी भाव असल्यामुळे शेतकरी हा हवालदील झाला आहे. यासाठी पानचिंचोली ग्रामस्थ आणि काँग्रेसच्या वतीने सोयाबीनची महाआरती करून केंद्र व राज्य सरकार यांनी सोयाबीनचा दरवाढीसाठी काहीतरी प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोयाबीनचा लागवडीपासूनचा खर्च व सोयाबीनचा भाव यावर्षी 4हजार ६०० असल्यामुळे एकरी होणारा खर्च हा २२ ते २५ हजार इतका असल्यामुळे सोयाबीन पासून शेतकऱ्यांना एकही रुपयाचा फायदा होणार नाही. भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे जवळपास एकूण 70 टक्के लोक शेती व शेतीशी निगडित व्यवसायावर अवलंबून आहेत जर शेतकरी जगला नाही तर अनेक उद्योग धंदे बंद पडतील यामुळे सरकारने सोयाबीनचा भाव वाढवावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. दोन वर्षाखाली सोयाबीनचा भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने ब्राझील या देशासोबत करार करून सोयाबीन आयात केल्यामुळे सोयाबीनचा भाव वाढत नाही यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे असा आरोप यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंखे यांनी केले. या आंदोलनासाठी गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
0 35 1 minute read