लातूर लातूरमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसतोय.. आज लातूरच्या नागझरी गावात मांजरा नदी पात्रात गावकऱ्यांनी उड्या मारत जलसमाधी आंदोलन केलय. यावेळी संत आंदोलकांनी आरक्षणाची मागणी केलीय. तर या आंदोलनात यावेळी महिलांचा देखील मोठा सहभाग होता. दरम्यान प्रशासनाने पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील तैनात केलाय. मात्र आरक्षणाच्या मागणीवर नदीपात्रातून काही तरुण बाहेर यायला तयार नाहीत.
लातूर जिल्ह्यातील नागझरी येथील बंधाऱ्यावर मराठा आरक्षणासाठी मांजरा नदीमध्ये या भागातील मराठा आंदोलकांनी उड्या घेत जलसमाधी आंदोलन केले. या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर सरकारने मराठा आरक्षणाला मंजुरी द्यावी अशी मागणी यावेळी या आंदोलन करताना केली. या आंदोलनामध्ये मराठा समाजातील अनेक स्त्रिया सहभागी झाल्या होत्या वेळीच प्रशासनाने दखल घेत सर्वांत लोकांना बाहेर काढले.
या आंदोलनात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अशा स्वरूपाचे आंदोलन चालूच राहतील असे आंदोलन करताना यावेळी सांगितले.
Video Link