लातूर

लातूर कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन..

लातूर- लातूर जिल्ह्यात या वर्षी सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. लातूर जिल्हा हा सोयाबीनचे केंद्र म्हणून ओळखला जातो पण या वर्षी ऐन सोयाबीन फुलात असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीक विमा मिळावा या मागणीसाठी आज लातूर कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यंदाच्या खरीप हंगामात जुलै ऑगस्ट या कालावधीमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात खंड दिला होता त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फुले धरण्याच्या ते शेंगा धरणाच्या कालखंडात पावसाने दडी मारल्याने पिकाचे 70 टक्के पेक्षा अधिक उत्पादनात घट  झाली आहे. पिक विमा योजनेच्या नियमानुसार 21 दिवसाचा खंड पडल्यास प्रतिकूल परिस्थिती या बाबी खाली शेतकऱ्यांना अग्रीम नुकसान भरपाई देण्याची तरतूद केलेली असतानाही अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देऊ केली नाही. शेतकरी संघटनेच्या वतीने या बाबीचा वेळोवेळी पाठपुरावाठा करूनही मुजोर अधिकारी याला दाद देत नसल्या कारणास्तव आज जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केल्याची भूमिका आंदोलन करताना व्यक्त केली. जर लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही झाली तर येणाऱ्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी रुपेश शंके यांनी दिला.   यावेळी रुपेश शंके युवा जिल्हाध्यक्ष, अशोक पाटील जिल्हाध्यक्ष,मदन सोमवंशी जिल्हा समन्वयक, बालाजी जाधव कार्याध्यक्ष,किशनराव शिंदे, कालिदास भंडे, वसंत कंदगुळे, हरिश्चंद्र सलगरे, समाधान क्षिरसागर, परमेश्वर स्वामी, रामेश्वर मसलगे आदी उपस्थित होते.

 

VIDEO LINK

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button