लातूर : कौशल्या अकॅडमी लातूरच्या वतीने आज रोजी धियः प्रचोदयन् कार्यशाळा व अग्रसंधनी दैनंदिनी प्रकाशन करण्यात आले. आमदार अभिमन्यू पवार, उप जिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, एम.ए. रंगूनवाला डेंटल कॉलेजच्या एचओडी डॉ. श्रीमती रेणुका नागराळे कौशल्या अकादमीच्या संचालिका वैशाली देशमुख व विजय केंद्रे यांच्या सह अन्य मान्यवरांच्या हस्ते अग्रसंधनी या दैनंदिनीचे प्रकाशन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये स्वयंप्रेरणा आणि स्वयंशिस्त रुजविण्याकामी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते आणि ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणाऱ्या सर्वच शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरेल असे आमदार अभिमन्यू पवार यांनी विश्वास व्यक्त केला. आज सकाळी ११ वाजता पडिले लॉन्स या ठिकाणी झालेल्या या नाविन्यपूर्ण कार्यशाळेसाठी १५० हून अधिक शाळांचे प्राचार्य – मुख्याध्यापक आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित राहिले. यावेळी खास विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक पध्दतीने तयार केलेल्या व वैदिक अभ्यास पध्दतीने प्रेरित असलेल्या अग्रसंधनी दैनंदिनीचा प्रकाशन सोहळा पार पडला आहे. या कार्यशाळेसाठी आ. अभिमन्यू पवार, उप जिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, पुण्याच्या एम.ए. रंगूनवाला डेंटल कॉलेजच्या एचओडी डॉ. श्रीमती रेणुका नागराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लहान मुलांवर अगदी लहानपणांपासून स्वच्छतेसह अनेक बाबींची शिस्त लावणे त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे असते. चांगला विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यार्थ्याला नेमके कसे शिकवणे, समजावणे आवश्यक आहे, हे महत्वाचे असते. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला शिकवलेले अंगवळणी पडले तरच त्या शिक्षणाला अर्थ राहणार आहे.
https://www.facebook.com/watch/live/?extid=WA-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=6aamW6&ref=watch_permalink&v=6822574364432355